आमच्या विषयी

सामाजिक कार्य करणाऱ्या व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सर्व बंधु-भगिनींना सौ. रेखा ताई कैलासराव सुर्यवंशी यांचा सप्रेम नमस्कार. आपण या मायभूमीत जन्म घेतल्यानंतर या मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आपल्या हातुन लोककल्याणाचे काहीतरी कार्य घडले पाहिजे. हा हेतू मनात ठेवून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करून १९ मे २०१५ रोजी ” कोमल स्वप्न महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था” प्लाॅट न. ३२४/१६ सिडको महानगर-१, तिसगाव वाळुंज औरंगाबाद या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून महिला विकास, बालकल्याण व आरोग्य नियंत्रणाचे कार्य करीत आहोत. हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज असते, यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून जनकल्याण योजना राबविल्या जातात.

आमचे उद्देश

  • आदिवासी, दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील मुलांना सर्व स्तरातील शिक्षणाची सोय व यासह तांत्रिक, अभियांत्रिकी, वाणिज्य, ज्ञान,कला, कृषी, शिक्षण शास्त्र, फार्मसी, वैद्यकीय, संगीत व नृत्य विभागातुन शिक्षण देणे.
  • मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक,, आदिवासी व इतर भटक्या जाती जमाती वर्गातील लोकांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे.
  • विद्यालये, महाविद्यालय, पदवी,पदवी का महाविद्यालय, शिक्षण संस्था इ. चालवून सामान्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहचवणे.
  • आश्रम शाळा,वस्तिगृह, वाचनालय, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, महिला आश्रम, बालसंस्कार केंद्र, क्रीडा मंडळ, व्यायाम शाळा, लोक शिक्षणालय इ. स्थापन करणे.
  • अंध, अपंग, मूकबधिर व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करणे.त्यांना शिकवून स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे.
  • युवक कल्याण विषयक योजना राबविणे.युवकांचे व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करणे, जनजागृती करणे.समाजसेवा शिबीर आयोजित करणे, युवक मेळावे घेणे.श्रमदान शिबीर घेणे.
  • युवकांना रोजगाराभिमुख व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.
  • विधवा, परित्यक्ता, निराधार महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे.
  • कुटुंब कल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, अपंग कल्याण राष्ट्रीय एकात्मता इ.कार्यक्रम राबविणे.आरोग्य विषयक, ग्रामस्वच्छता, लोकसंख्या नियंत्रण, एड्स नियंत्रण या बाबतीत चर्चासत्र, मेळावे आयोजित करणे.
  • दवाखाने, रूग्णालय सुरू करणे.ग्रामिण व शहरी भागात रूग्ण वाहिका सुरू करणे.ब्लड बॅंक,पॅथालाॅजी लॅब, नर्सिंग कॉलेज सुरू करणे.
  • कृषी विज्ञान केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांना कृषी विषयक माहिती देणे.
  • पर्यावरण संतुलन, स्वच्छता, पाण्यातील प्रदुषण या बाबतीत चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करणे.
  • वातावरणातील प्रदुषणा बाबतीत जनमानसात जागृती करणे.
  • अतिवृष्टी,पुर,भुकंप, वादळं अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम राबविणे.
  • सैनिकी शाळा सुरु करणे.पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणे.
  • ग्रंथालय शास्त्रवर चर्चासत्र, परिषदा, व्याख्याने, संमेलन, अभ्यास शिबीर आयोजित करणे.फिरती वाचनालये सुरू करणे.ग्रंथालयाच्या अभिलेखांसाठी संगणकीकरण करणे.
  • निबंध, चित्रकला, सत्कृत्य,गायन,लेखन,नाट्य व संगीत स्पर्धा आयोजित करणे.
  • संगणक शिक्षण केंद्र सुरू करणे.साॅफ्टवेअर, हार्डवेअर, इंटरनेट,वेब डिझाईन चे प्रशिक्षण देणे.

आमच्यासोबत मिळून कार्य करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.