सामाजिक कार्य करणाऱ्या व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सर्व बंधु-भगिनींना सौ. रेखा ताई कैलासराव सुर्यवंशी यांचा सप्रेम नमस्कार.आपण या मायभूमीत जन्म घेतल्यानंतर या मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आपल्या हातुन लोककल्याणाचे काहीतरी कार्य घडले पाहिजे.हा हेतू मनात ठेवून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करून १९मे २०१५ रोजी ” कोमलस्वप्नमहिलाबहुउद्देशीयसेवाभावीसंस्था” प्लाॅट न.३२४/१६ सिडको महानगर-१, तिसगाव वाळुंज औरंगाबाद या संस्थेची स्थापना केली.या संस्थेच्या माध्यमातून महिला विकास, बालकल्याण व आरोग्य नियंत्रणाचे कार्य करीत आहोत.हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज असते यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून जनकल्याण योजना राबविल्या जातात.
थोडक्यात पण महत्वाचे
नवीन शाळेचे उद्घाटन
गरजूंना धान्य वाटप
हरीनाम सप्ताह आयोजन
राजमाता जिजाऊ यांची जयंति साजरी
होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप
कोमल स्वप्न महिला बहुउदेशीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख अम्बादास दानवे यांच्या वाढदिवसा निम्मित सड़को महानगर -१ येथे कोमल स्वप्न ब्युटीपार्लर व प्रशिक्षण केंद्राचे उट्घाटन व २५ महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या
"सिडको वाळूज महानगरात वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. दिंडीत सहभागी मान्यवरांच्या हस्ते कडुलिंब, आंबा, पिंपळ, चिंच, सप्तपर्णी, अशोक, गिरीपुष्प, इत्यादी, वेगवेगळ्या प्रकारची जवळपास ३०० पेक्ष्या अधिक झाडे लावण्यात आली..."